आरटीओ कार्यालयामार्फत हेल्मेट जनजागृती रॅली..प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दाखविली हिरवी झेंडी
जळगाव,दि.९(प्रतिनिधी) आरटीओ कार्यालयाने नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतूक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने शहरात हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित केली होती. रॅलीची सुरुवात प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.
हेल्मेट घालून वाहन चालवणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव नागरिकांमध्ये करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे रस्त्यावरील सुरक्षा नियम, ट्रॅफिक सिग्नल पाळणे, ओव्हरस्पीडिंग टाळणे आणि मद्यपान करून वाहन चालवणे टाळणे यासारख्या मुद्द्यांवर जनजागृती करण्यात आली.
आरटीओ अधिकाऱ्यांनी या मोहिमेबद्दल बोलताना सांगितले की, "सुरक्षित वाहतूक ही सर्वांची जबाबदारी आहे. या मोहिमेद्वारे आम्ही नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतूक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत." या मोहिमेला शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आणि सुरक्षित वाहतूक करण्याचे शपथ घेतली.