पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे पंकज शिक्षक गौरव पुरस्काराने आर डी पाटील व विजया पाटील सन्मानित..
चोपडा दि.२५(प्रतिनिधी):- पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या संकल्पनेतून व पंकज बोरोले यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास दृष्टिकोनातून पंकज शिक्षक गौरव पुरस्कार ५ सप्टेंबर शिक्षक दिनी जाहिर करण्यात आले होते. सन २०२४ या पुरस्कारासाठी प्राथमिक विभागाचे आर डी पाटील व माध्यमिक विभागाच्या विजया पाटील यांची निवड करण्यात आली होती. सदर पुरस्कारांचे वितरण २४ डिसेंबर रोजी पूज्य साने गुरुजींच्या जयंतीचे औचित्य साधून *रंगतरंग* सांस्कृतिक महोत्सवात दोन्ही आदर्श शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी युवा संचालक पंकज बोरोले, सुभाष बाळकृष्ण पाटील व सौ. कल्पना सुभाष पाटील ( पुणे ) , मनोज आत्माराम पाटील - तज्ञ संचालक ग. स. पतपेढी जळगाव व अध्यक्ष - स्वामी समर्थ शैक्षणिक मंडळ , अजबसिंग सोनूसिंग पाटील - अध्यक्ष - ग. स. पतपेढी जळगाव , ए टी पवार - उपाध्यक्ष - ग. स. पतपेढी जळगाव , आशिष पुंडलिक पवार - अध्यक्ष - खा. प्रा. शिक्षक पतपेढी , स्वाती धनंजय फिरके - उपाध्यक्ष - खा. प्रा. शिक्षक पतपेढी , अजय सोमवंशी - ग. स. पतपेढी जळगाव कर्ज नियंत्रण समिती, विजय दगा पाटील - तज्ञ संचालक ग. स. पतपेढी जळगाव , एकनाथ गुलाबराव पाटील - तज्ञ संचालक ग.स. पतपेढी जळगाव , प्रा.हेमंत अंकुश पाटील - संचालक ,बालकवी ठोंबरे विद्यालय धरणगाव , उपाध्यक्ष अविनाश राणे ,सचिव अशोक कोल्हे ,गोकुळ भोळे, नारायण बोरोले, सौ.हेमलता बोरोले, सौ.दिपाली बोरोले यांसह विभागप्रमुख प्रो.आर आर अत्तरदे, एम व्ही पाटील , व्ही आर पाटील, मिलिंद पाटील , केतन माळी, मीना माळी आदीं मान्यवर उपस्थित होते.
सदर पुरस्कार साठी प्राथमिक विभागातून आर डी पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर माध्यमिक विभागातून सौ.विजया यशवंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.सदर निवडी साठी काही निकष ठेवण्यात आले होते त्यात शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक पात्रता वाढीसाठी केलेले प्रयत्न, संशोधनपर निबंध ,वृत्तपत्र / नियतकालिकात प्रकाशित लेख / ग्रंथलेखन / प्रकाशित पुस्तके, वर्गातील विद्यार्थ्यास विविध क्षेत्रात प्राप्त यश / निवड / पुरस्कार,शाळेसाठी समाजाकडून मिळविलेले योगदान ,अध्यापनातील विविध प्रयोग / नवोपक्रम ,कुशाग्र व अध्ययनात गती कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केलेले विशेष प्रयत्न, विविध कार्यशाळेत सहभाग व प्रमाणपत्र इत्यादी बाबींचा समावेश होता.
आर डी पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यात विमानाने शैक्षणिक सहलीचे आयोजन, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर तज्ञ मार्गदर्शक, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन भाग १ ते ४ राज्यस्तरीय प्रशिक्षणात सक्रिय सहभाग, साप्ताहिक किमया माझ्या हाती - विविध साहित्य लेखन, रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक असोसिएशन धुळे यांचे तर्फे गुरूगौरव पुरस्कार, मानवसेवा विकास फाऊंडेशन अंजनगाव सूर्जी अमरावती यांचे तर्फे महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री. साई प्रतिष्ठान वडगाव शेरी पुणे तर्फे महाराष्ट्र गुणवंत गौरव पुरस्कार, फुले, शाहू,आंबेडकर राष्ट्रीय लोकमित्र पुरस्कार, लोकसत्ता संघर्ष संस्था अहमदनगर तर्फे आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार, संत गाडगेबाबा महाराज सर्व धर्म समभाव पुरस्कार, सामाजिक एकता पुरस्कार, संस्कार प्रतिष्ठान पुणे तर्फे श्री. स्वामी विवेकानंद आदर्श शिक्षक पुरस्कार, आत्मिया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस मुंबई व विद्या प्रबोधिनी जळगाव यांच्या तर्फे आयकॉनिक मेंटोर इन कोचिंग अवॉर्ड, विश्वशांती बहुउद्देशिय सेवा संस्था पुणे तर्फे महाराष्ट्र गुणवंत गौरव पुरस्कार, क्रांती ग्राम विकास संस्था मुंबई व नेहरू युवा केंद्र नवी दिल्ली तर्फे विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार, या शिवाय श्रमश्री बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून व डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पेतून साकारलेला १५० दीव्यांग कलाकारांचा स्वरानंदवन कार्यक्रमांचे दोन वेळा यशस्वी आयोजन, पंढरपूर येथील पालवी संस्थेतील एच आय व्ही एड्सग्रस्त मुलांच्या कार्यक्रमांचे दोन वेळा यशस्वी आयोजन, पाणी आडवा पाणी जिरवा, नाला खोलीकरण , आदिवासी पाड्यांवर फराळ, कपडे, बुट, चप्पल, स्वेटर आदी वस्तूंचे वाटप.. इत्यादी उल्लेखनीय कार्य केले आहे.
सौ. विजया पाटील यांनी इन्स्पायर अवार्ड , अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सहभाग, विविध विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग ,शैक्षणिक साहित्य निर्मिती तसेच विविध कार्यशाळेत सहभाग नोंदविला आहे.
तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्यात
रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे Nation Buider Award २०१८ , समाजकार्य महाविद्यालय,इनरविल क्लब चोपडा तर्फे...आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्कार , डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन Innovative Science Teacher Award. , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठा समन्वय समिती आदर्श शिक्षिका पुरस्कार , वैज्ञानिक, शैक्षणिक व साहित्य निर्मितीत जिल्हास्तरावर निवड , ज्येष्ठ शास्त्रज्ञ नॅशनल केमिकल लॅब पुणे डॉ.अरविंद नातू आईसर पुणे यांचे पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ,
वरिष्ठ शास्त्रज्ञ आपल्या भेटीला उपक्रम.विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावा, विज्ञान परिसंवाद, विज्ञान दिनविशेष सातत्यपूर्ण सहभाग व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे....