महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील लिपीक वर्गीय गट क कर्मचा-यांसाठी विभागीय परिक्षेचे नियोजन
जळगाव, दि.5(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत लेखा विषयक काम करणारे लिपीक वर्गीय (वर्ग ३) कर्मचाऱ्यांसाठी १० वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग १ व २) ही डिसेंबर-२०२४ मध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे.
या परिक्षेचे परिपत्रक https://mahakosh.maharashtra.gov.in च्या employee corner मधील Exams Tab किंवा DAT (mahakosh.in) च्या Notice board वर उपलब्ध आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार येथील वित्त विभागाचे व इतर विभागातील लेखा विषयक काम करणारे वर्ग ३ कर्मचारी ही परिक्षा देऊ शकणार आहे. या पदासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांनी दिनांक 0८ नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज कार्यालय प्रमुखाकडे द्यावयाचे आहेत. या कार्यालय प्रमुखांनी परिक्षेसाठीचे अर्ज छाननी करुन सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक येथे दिनांक १४ नोव्हेंबर 2024 पर्यंत पाठवायची आहे. दिनांक १४ नोव्हेंबर 2024 ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. तरी या पदासाठी इच्छुक पात्र कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत त्यांचे अर्ज पाठवावे, असे आवाहन नाशिक विभागाचे लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक, महेश मुरलीधर बच्छाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0 0 0