धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य संस्थांनी पायाभूत सुविधा अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य संस्थांनी पायाभूत

सुविधा अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

                     

  जळगाव दि.४ ( प्रतिनिधी ) : - धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेसाठी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समिती,सदस्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

            २०२४-२५ साठी अनुदान प्राप्त करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी अल्पसंख्यांक विकास विभागाचा ७ ऑक्टोबर २०१५  च्या तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे मुदतीत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी  www.maharastra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे ही श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.                                                                       000000

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने