खाकी वर्दीतील साहित्यिकाचा आमदारांकडून सत्कार.. पोलिसाकडून "पोलीस महासंचालक" पुस्तकाचे लेखन

खाकी वर्दीतील साहित्यिकाचा आमदारांकडून सत्कार.. पोलिसाकडून "पोलीस महासंचालक"  पुस्तकाचे लेख

 चोपडा दि.१२(प्रतिनिधी)आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी केला आपल्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा सत्कार केला आहे.

जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद अहिरे यांची ड्युटी चोपडा विधानसभा मतदारसंघातील आमदार  सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी आहे त्यांचे नुकतेच काळजातील पोलीस महासंचालक हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे सदर पुस्तकास महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळत आहे याच काळात त्यांची ड्युटी  आमदार लताताई सोनवणे यांच्या निवासस्थानी असताना त्यांची साहित्याची गोडी लक्षात घेता  माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी त्यांना आपले अँटी चेंबर वाचनासाठी व लेखनासाठी उपलब्ध करून दिले या पुस्तकाचे 80 टक्के लेखन अहिरे यांनी याच अँटी चेंबर मध्ये केलेले आहे तसा उल्लेख त्यांनी पुस्तकातील आपल्या मनोगतात व्यक्त केलेला आहे त्यांचे या पूर्वी मृत्यू घराचा पहारा व हुंकार वेदनेचा या पुस्तकांचे यापूर्वी प्रकाशनही झालेला आहे अशा या साहित्यिक व लेखक पोलीस नाईक विनोद अहिरे यांचा सत्कार माननीय आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी केला त्याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील व चोपडा येथील लाडकी बहीण योजनेचे सदस्य विकास पाटील कैलास बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने