राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यां पोहचल्या नगरपालिकेत.. मुख्याधिकाऱ्यांनी घेतली झटपट दखल

  राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यां पोहचल्या नगरपालिकेत.. मुख्याधिकाऱ्यांनी घेतली झटपट दखल 

चोपडा,दि.२५(प्रतिनिधी):-चोपडा शहरातील वार्ड क्रमांक सात मधील बडगुजर गल्लीला लागूनच सार्वजनिक शौचालय आहे त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य असून त्याठिकाणी भयंकर दुर्गंधी पसरली असून आजूबाजूच्या नागरिकांना अत्यन्त त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्यासंदर्भात चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा स्वाती बडगुजर यांच्यासह संगीता बडगुजर गायत्री परदेशी, प्रमिला बडगुजर,बेबी बडगुजर, रत्ना भोई,अनिता भोई,दीपक भोई,राजेंद्र भोई,अरुण भोई,आदी लोकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांना निवेदन दिले.  निवेदनाची त्वरित दखल घेत मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी जेसीबी पाठवून साफसफाई करून कार्यवाही केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने