नागलवाडी वराड परिसरात ओसंडून वाहू लागले बंधारे.. शेतकऱ्यांच्या तोंडून आमदारांची वाह वा..!

 नागलवाडी वराड परिसरात ओसंडून वाहू लागले बंधारे.. शेतकऱ्यांच्या तोंडून आमदारांची वाह वा..!


चोपडा दि.२५(प्रतिनिधी) : चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आमदार श्री प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतुन  नागलवाडी परीसरात शेतकऱ्यांसाठी शेतीकरीता पाणी आडवण्यासाठी सिचंन करीता बंधारे बांधण्यात आले व आज रोजी नागलवाडी चोपडा शिवारात बंधारा पाण्याने फुल्ल भरुन ओसांडुन वाहु लागले असून भविष्यात पाण्याची पातळी वाढण्यास मदत होऊन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार असल्याने नागलवाडी ,वराड  परीसरातील शेतकऱ्यांनी आमदार दाम्पत्याचे मनापासून  आभार मानले आहेत.

ओसंडून वाहू लागलेल्या बंधाऱ्याजवळ जाऊन पाहणी प्रंसगी सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ ओतारी, गुलाबआण्णा माळी, भिका पाटील ,नाना माळी, राजेद्रं महाजन, कैलास महाजन, जयराम महाजन, विकास शेटे, महेद्रं महाजन, संदीप पाटील, संजय सुर्यवंशी, राजु महाजन, मंगल पावरा, सोनु महाजन, प्रंशात महाजन व शेतकरी  उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने