बोंबाबोंब..! अहो भाऊसाहेब..गावाकडे ढूंकून पाहालं काय?वर्डी गावकऱ्यांचा संतापजनक सवाल

 बोंबाबोंब..! अहो भाऊसाहेब..गावाकडे ढूंकून पाहालं काय?वर्डी गावकऱ्यांचा संतापजनक सवाल 

चोपडा,दि.२७(प्रतिनिधी) तालुक्यातील वर्डी व चहार्डी हे दोन प्रमुख मोठे गावे म्हणून व नेत्यांच्या नावाने   तालुक्यात ओळखली जातात. वर्डी या गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात संत सुकनाथ बाबा समाधी स्थळाने होते.कधी नव्हे एवढी काम सद्ध्या तालुक्यात आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या माध्यमातून सुरू असून निधी देखील कोणत्याही कामाला कमी पडू दिला जात नसल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जातेय.मात्र या गावाला लाभलेले भाऊसाहेबांचा कारकार ढीम्मा असून  गावकऱ्यांची कोणतीच कामे वेळेवर होत नसल्याने प्रचंड हेडसांड होत आहे . याप्रकरणी बिडीओ रावसाहेबांनी दूर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

     वर्डी गावात कार्यरत ग्रामसेवक आहेत ते महीना महीना वर्डी गावात पाय ठेवत नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी  केला असून त्यांचा मनमानी कारभार व गावातील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून सरपंच व ग्रामसेवक यांच्या मिलीभगत ला गावकरी कंटाळले आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांनी मनमानी करून पैसे कसे चुकीच्या पद्धतीने काढून गैरवापर केला ते जनतेसमोर उघडकीस आणले होते.विविध वस्तू खरेदी करताना अव्वाच्या सव्वा बिल सादर करणे,इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लाईट,पिण्याच्या पाण्यासाठी जो खर्च केला त्याचे ही बिल अवाजवी लावली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.वेळेवर  ग्रामसेवक हजर राहत नसल्याने जनतेचे होणारे हाल थांबवण्यासाठी बिडीओ वाघ यांच्याकडे ही वारंवार वर्डी ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत तरीही बिडीओ वाघ दुर्लक्ष करीत आहेत असेही ग्रामस्थांनी सांगितले. अश्या ह्या ग्रामसेवकाचा वर्डी येथून पदभार काढावा अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने