गणपूरच्या स्वप्नील पाटीलची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवड

 गणपूरच्या स्वप्नील पाटीलची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवड                         

 चोपडा...यश संपादन केल्यानंतर पेढा भरवतांना स्वप्नील पाटील चे आई वडील

  गणपूर(ता चोपडा)ता 29 : येथील रहिवाशी स्वप्नील ज्ञानेश्वर पाटील यांनी संघ लोकसेवा आयोग (यु पी एस सी ) व केंद्रीय सचिवालया मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.त्यांचे शालेय शिक्षण चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातून व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज  मधून झाले आहे . स्वप्नील हा पातोंडा(ता अमळनेर)येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक ज्ञानेश्वर काशिराम पाटील ( डी के पाटील) यांचा मुलगा आहे. सहा महिने प्रशिक्षण झाल्यावर मूळ पदावर नेमणूक होणार असल्याचे स्वप्नील पाटील यांनी सकाळशी बोलतांना सांगितले.......





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने