रावेर लोकसभेचा मीच उमेदवार आमदार एकनाथराव खडसे यांचा पुनश्च दावा..

 

रावेर लोकसभेचा मीच उमेदवार आमदार एकनाथराव खडसे यांचा पुनश्च दावा..


♦️२०२४ निवडणूकीचे वर्षं ..

♦️येत्या १५ दिवसात आघाडीचे चित्र होणार क्लिअर

चोपडा दि.३१(प्रतिनिधी)रावेर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असताना आमदार खडसेंनी पुन्हा रणशिंग फुंकत आपणच रावेरच्या जागेवर दावेदार असल्याचे पुन्हा सांगितले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, वाटाघाटीत ही जागा कुणाला मिळेल हे आत्ताच सांगता येणार नाही मात्र राष्ट्रवादीतर्फे आपण लोकसभेचे उमेदवार राहणार आहेत. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला 35 ते 40 जागा निश्चित मिळतील, असा दावाही त्यांनी केला.
आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, रावेर मतदारसंघाची लोकसभा जागा राष्ट्रवादीला मिळावी, असा आमचा आग्रह आहे. रावेर मतदारसंघासाठी मी इच्छुक आहे. पक्षानेही मला या जागेसाठी लढण्यास सांगितले आहे. तब्येतीचे कारण आहे. डॉक्टरांची सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ. महाआघाडीच्या माध्यमातून मी या जागेवर लढण्यास इच्छुक आहे. ही जागा आम्ही जिंकून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*नाथाभाऊला विरोध करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा*
जळगाव जिल्ह्यात सर्व विरोधक आणि मी एकटा असे चित्र वारंवार दिसून येतंय. याचा अर्थ नाथाभाऊला विरोध करावा असं सत्ताधारी पक्षाच्या सर्वांना वाटते. नाथाभाऊला व्यक्तिगत विरोध करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. शेतकरी आत्महत्या, विकासाच्या दृष्टीने जे प्रश्न आहेत त्यावर अधिक लक्ष घालावे, असा टोला एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिला.
दरम्यान, महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा नाही. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पुढील 15 दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या या जागांचा निर्णय होईल. जास्तीत- जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. आगामी वर्ष निवडणुकांचे आहे. त्यामुळे यात यश मिळावं असा आमचा संकल्प आहे असंही खडसेंनी सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने