आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी आदिवासी पाड्यांवर दिले रस्त्याची कामे

 आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी आदिवासी पाड्यांवर दिले रस्त्याची कामे

चोपडा दि.१७(प्रतिनिधी)येथील कार्यसम्राट आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या विकास निधीतून आदिवासी पाड्यांवर रस्ता बनविण्यासाठी निधी दिला. त्याचे भूमिपूजन मोठ्या थाटात करण्यात आले.

    सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात रहिवास असलेल्या आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावे यासाठी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी अनेक विकास कामे केलीत व करीत राहणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पांढरी येथे रस्त्याच्या कामाचे , रामजी पाडा येथील रस्ता व पंचक येथील तडवी आदिवासी बांधवांना गावात येणारा रस्ता अशा कामाचा शुभारंभ १६ डिसेंबर रोजी दुपारी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच बुऱ्हानखा तडवी, माजी लोकनियुक्त सरपंच भावनाताई पंढरीनाथ माळी, ग्रामपंचायत सदस्या भारतीताई सचिन महाजन, ग्रामपंचायत सदस्य अलताफखां पठाण, पंकज महाजन, संदीप महाजन, जुनेद खान, रियाजअली सैयद, जावेदखा पठाण, संजीव शिरसाठ आदिवासी सेवक तथा संजय गांधी निराधार समिती सदस्य , चंद्रशेखर साळुंखे, किशोर पाटील, सौ. नायजाताई पावरा पो पा.पांढरी आदर्श सोनवणे वनगाव,रामजी बारेला, यासु बारेला, गुलाब बारेला, खेलसिंग बारेला, सौ सिंधुबाई बारेला, प्रदीप बाविस्कर यांचेह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने