चोपडा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर अडावद,लासुरसह अनवर्दे खुर्द चा समावेश..

 चोपडा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

अडावद,लासुरसह अनवर्दे खुर्द चा समावेश..







चोपडा दि.३(प्रतिनिधी): राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून चोपडा तालुक्यातील  २२ ग्रामपंचायतीचा  निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यात लासुर,अडावद, या मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. तर जळगाव जिल्ह्यात १६८ ग्रामपंचायतींत निवडणूक रंगणार आहे.

चोपडा तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या २२ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे

♦️१)वडती      ♦️२)मालखेडा
♦️३)वाळकी.   ♦️४)आडगाव
♦️५)वडगावबु. ♦️६)विष्णापूर,
♦️७)सुटकार.   ♦️८)लासुर
♦️९)तावसे बु.  ♦️१०)अडावद
♦️११)कठोरे.   ♦️१२)धुपे बु
♦️१३)वराड.    ♦️१४)गणपूर.     ♦️१५)अनवर्दे खुर्द
♦️१६)विचखेडा♦️१७)अंबाडे.      ♦️१८)पारगाव. ♦️१९)नरवाडे.  ♦️२०)घुमावल बु  ♦️२१)तावसे खु
♦️२२)कोळंबा

राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्य पदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील.त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या
वेळेत मतदान होईल. मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.मात्र, गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने