चोपड्यात बुधवारी रथोत्सव; व्यंकटेश बालाजी संस्थानचा शेकडो वर्षांच्या उपक्रम,यात्रा देखील

 चोपड्यात बुधवारी रथोत्सव; व्यंकटेश बालाजी संस्थानचा शेकडो वर्षांच्या उपक्रम,यात्रा देखील

चोपडा दि.२३(प्रतिनिधी)- येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे चारशे वर्षांची विशाल परंपरा असलेला रथोत्सव आज दि.२५ आक्टोबर साजरा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी यांनी दिली आहे.

श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव दि.२५ व २६ ला होणार आहे.दि.२५ ला सकाळी १० वाजता गोलमंदिरा जवळील श्री.बालाजी मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाला प्रारंभ होईल.यावेळी सर्व मानक-यांच्या हस्ते पुजाविधी देखील पार पडतील.त्यानंतर जयघोषात आशा टॅाकीज,ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर, रथ मार्गाने रथ आठवडे बाजार,पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल.त्याठिकाणी रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी राहिल.तर दि.२६ रोजी रथाच्या परतीच्या प्रवासाला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोलमंदिराजवळ येवून यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल.या निमित्ताने रथोत्सव काळात शहरात दोन दिवसाची रथयात्रा देखील भरत असते.खान्देशासह मध्यप्रदेशातून भाविक रथाच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी येत असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने