चोपडा आगारामार्फत सुट्टीचा कालावधीत देवदर्शनासाठी बसेस ची सेवा..प्रवाशांनो वाजवी खर्चात लूटा आनंद.. आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील
चोपडा दि.३(प्रतिनिधी ): चोपडा आगारा मार्फत खास श्रावणमास निमित्त जास्त सुटीचा कालवधी असल्याने दि. १३ ते २० ऑगष्ट २०२३ दरम्यान पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे / देवदर्शन करिता पुरेशा प्रवासी मागणी नुसार जादा बसेस उपलब्ध (४४प्रवासी जमल्यास) करण्यात आली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटिल यांनी दिली आहे.
समुहाने पावसाळी सहलीचा आनंद लुटायचा असल्यास अथवा देवदर्शनाचा लाभ घ्यावयाचा असल्यास चोपडा आगाराने सुट्टीचा कालावधीचे लक्ष वेधत घृष्णेश्वर - वेरुळ - म्हैसमाळ - भद्रामारोती,कपिलेश्वर - सारंगखेडा - प्रकाशा,
सप्तशृंगी गड - त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ४४ प्रवाशांच्या गटाने मागणी केल्यास बस सेवा देण्यात येणार आहे.तसेच या व्यतिरिक्त इतरही पर्यटन स्थळी मागणी नुसार जादा बस मिळेल अशी माहितीही त्यांनी दिली आहे
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या महिला, अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरीक, दिव्यांग सवलती लागू असल्याचेही स्पष्ट केले असून सदर गाड्यांचे आगाऊ आरक्षणाकरता संपर्क
श्री महेंद्र पाटील ( चोपडा आगार व्यवस्थापक मो. 9405863594 ),परेश बोरसे ( स्थानक प्रमुख:मो. 8766726744 ),श्री नितीन सोनवणे (वाहतूक निरीक्षक मो. 8308602185), श्री ए.टि. पवार (सहा. वाहतूक निरीक्षक मो. 9403757053),महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चोपडा बसस्थानक ( 02586-220027) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.