सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल विभागाचा युवा संवाद कार्यक्रम संपन्न

 सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल विभागाचा युवा संवाद कार्यक्रम संपन्न


चोपडा दि.३ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी.बी. निकुंभ माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात महसूल व वन विभाग अंतर्गत १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत आयोजित युवा संवाद कार्यक्रमाचा प्रारंभ  झाला. 

या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी श्री. एकनाथ बंगाडे,  चोपडा तहसीलदार श्री. भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार श्री. सचिन बाबळे , श्री.आर.बी.माळी, संस्थेचे सचिव जवरीलाल जैन, भानुदास पाटील, रमेश पाटील  उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवर,तलाठी, ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला.या सप्ताह अंतर्गत इ .९ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांना  विविध प्रमाणपत्रांची माहिती, ई-पीक पाहणी एप, नवीन मतदार नोंदणी अर्ज स्वीकारणे व त्यांचा सत्कार तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. परिसरातील कृषी मित्रांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजना व विविध प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, त्याचा प्रसार प्रचार आपल्या घरी तसेच परिसरात करावा असे प्रांत अधिकारी श्री.बंगाडे   यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. पी. बिऱ्हाडे यांनी केले. आभार प्रदर्शन हातेड मंडळचे तलाठी श्री.आशिष निचित यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. आर.पी. चौधरी, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने