अनुसूचित जमातीच्या तरूणांसाठी स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण..27 जुलैला रावेरला मुलाखती
प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक) महाराष्ट्राचा रहिवासी असावा.शालांत परीक्षा (इयत्ता १० वी) उत्तीर्ण असावा. वय १८ वर्ष पूर्ण असावे. वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकडून विविध शासकीय/ निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची पूर्वतयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना उपस्थितीनुसार दरमहा रूपये १००० विद्यावेतन व प्रशिक्षण पूर्ण केल्यावर ४ पुस्तकांचा मोफत संच प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, १० वी, १२ वी व पदवी गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला या कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रतीसह स्व:खर्चाने उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २. शनी मंदीरामागे स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर किंवा संपर्कासाठी दूरध्वनी ०२५८४-२५१९०६, भ्रमणध्वनी - ८६६८८१७८९३ (अमिन तडवी, कनिष्ठ कौशल्य विकास. रो. व.उ.मा.अधिकारी) यांच्याशु क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन ही श्री.मुकणे यांनी केले आहे.