..त्या शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्षाला अटक.. : बनावट कापसाच्या बियाण्याची विक्री..९५ पाकिटे जप्त.. गुणवत्ता विभागाची धडक कारवाई
चोपडा,दि.२५(प्रतिनिधी) : 'स्वदेशी ५' या बनावट कापूस निरीक्षक अरुण तायडे यांना मिळाली. बियाणांच्या विक्रीप्रकरणी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षालाच अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी चोपड्यात उघडकीस आली. संदीप आधार पाटील (३५, रा. वर्डी, ता. चोपडा) असे संशयिताचे नाव आहे.
रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संदीप आधार पाटील याने संबंधित बियाणे विक्रीसाठी
आणल्याची माहिती मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली. आली आहे.या बियाणांची किंमत जवळपास एक लाख रुपये आहे. चोपडा धरणगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेल न्यू सुनीतामध्ये बनावट बियाणे शहर पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये तपासणी केली असता संदीप पाटील हा दोन प्लास्टिकच्या पिशव्या ठेवून गेल्याची माहिती हॉटेलचे मॅनेजर अमोल राजपूत यांनी दिली. त्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यात अंकुर सिड्स कंपनीचे स्वदेशी ५ संकर देशी कापूस बियाणे असलेली ९९ हजार ७५० रु. किमतीची ९५ सीलबंद पाकिटे आढळून तायडे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसांत संदीप पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर सायंकाळी त्याला वर्डी येथून ताब्यात घेण्यात आले.