वर्डी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रदीप नायदे यांची निवड

 वर्डी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रदीप नायदे यांची निवड

वर्डी ता चोपड़ा दि.२५(वार्ताहर) येथील  सरपंच सौ ललिता दत्तात्रय पाटील यांनी मौखीक कराराने ठरल्या प्रमाणे राजीनामा दिल्याने, रिक्त पदासाठी येथील ग्रामपंचायत कार्यालय दिनांक २४ मे रोजी रिक्त असलेल्या सरपंच पदाच्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.  यावेळी १७ ग्रामपंचायत सदस्य हजर होते,  सरपंच पदासाठी प्रदीप काशिनाथ नायदे व मच्छिंद्र उत्तम साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामधून मतदार प्रक्रियेद्वारे प्रदीप नायदे यांना नऊ मते मिळाली, तर मच्छिंद्र साळुंखे यांना आठ मते मिळाले. मंडळ अधिकारी लासुर विभाग आर. जे. बेलदार यांनी प्रदीप नायदे यांना विजयी घोषित केले .निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रभारी तलाठी  व्ही.डी पाटील .ग्राम विकास अधिकारी कुंदन कुमावत, विश्वास शिंदे ,लिपिक संदीप पाटील यांनी सहकार्य केले . माजी सरपंच ललिता पाटील तसेच  माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायकराव चव्हाण,माजी सरपंच नंदलाल पाटील,माजी सरपंच बबिता धनगर,रविंद्र धनगर,भगवान नायदे,रायभान धनगर,नंदलाल शिंदे,महेंद्र पाटील,देवेंद्र पाटील,महारू सुलताने, कविश्वर,पाटील, उमाकांत चव्हाण,प्रभाकर नायदे,सतिष धनगर  सह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी फुलहार ,पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पी .के नायदे यांच्या निवडीबद्दल परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने