चोपडयातील भाविकांनो निर्माल्य फेकू नका..आता "निर्माल्य रथ "थेट मंदिरापर्यंत..स्व. हुकुमचंद जैन स्मरणार्थ सेवा सुरू
चोपडा दि.२६ (प्रतिनिधी) :चोपडा शहरात गेल्या काही दिवसांपासून देवांचे देव महादेव मंदिर बांधकामास वायु वेगाने सुरुवात असून गल्ली गल्लीत भोलेनाथाचा गजर घुमू लागला आहे. शिवमहापुराण कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या प्रवचनाच्या जादुई कथनाने मंदिरात तोबा गर्दी उसळत आहे मात्र मंदिर गाभाऱ्यात भरगच्च निर्माल्य तयार होत असून ते टाकावे कुठे हा गहन प्रश्न निर्माण झाला आहे हे लक्षात घेऊन स्व. हुकुमचंद जैन यांच्या पुण्य स्मणार्थ सचिन जैन यांनी मित्र परिवार व लोहिया नगर महीला भजनी मंडळ सहकार्याने "निर्माल्य रथ"सेवेचा प्रारंभ केला आहे त्यामुळे आता पूर्ण शहरातील निर्माल्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे.
दर मंगळवारी संपूर्ण शहर परिसरातील महादेव मंदिर व अन्य मंदिरातील निर्माल्य गोळा करण्यात येणार असल्याने भाविकांनी निर्माल्य इतरत्र न फेकता आमच्या गाडीत टाकून सहकार्य करावे असे आवाहन सेवार्थ साधकांनी केले आहे. तरी मंदिर निर्माण कार्यकर्त्यांनी अथवा भाविकांनी पुढील संपर्क नंबर संपर्क साधावा.श्री सचिन जैन 7020651181,श्री साहेबराव महाजन 9423750271,श्री देवा महाजन9518317431 अतूल मराठे 93254 96043निंबा माळी 9922129446 ,गोपाल महाजन