नूतन मराठा कॉलेजात 18 महा बटा एनसीसी तर्फे पर्यावरण जनजागृती..
जळगाव दि.२५(प्रतिनिधी): शहरातील चारमहाविद्यालयातील छत्रसैनिकांसाठी 'पर्यावरण बचाव' जनजागृती कार्यक्रम' 18 महा NCC बटा, जळगांव चे कामांडीग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पवनकुमार यांच्या नेतृत्वाखालील नुकताच पार पडून नूतन मराठा कॉलेज, बाहेती कॉलेज, मुळजी जेठा कॉलेज, जी डी बेंडाळे कॉलेज या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
कार्यक्रमात लेफ्ट कर्नल पवन कुमार यांनी छत्रसैनिकांना पर्यावरण वाचविण्यासाठी मार्गदर्शन केले, तसेच प्रश्न उत्तरे घेऊन शंकांचे निरसन केले.त्यानंतर
छत्रसैनिक गणेश भोईटे, दुर्गेश पाटील आणि प्रेरणा पाटील यांची पर्यावरणावर भाषण होऊन त्यांना कँप देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ लेफ्ट योगेश बोरसे यांनी केले तर लेफ्ट शिवराज मानके यांनी छत्रसैनिकांना पर्यावरण वाचविण्यासाठी शपथ दिली.
कार्यक्रमाप्रसंगी बटालियन चे कॅप्टन डॉ योगेश बोरसे, लेफ्टनंट शिवराज मानके, सिटीओ हेमाक्षी वानखेडे, सिटीओ सायली पाटील, सुभेदार जयपॉल, , राजुराम, सतीश, अरुनकुमार ,जहिर अहेमद यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .