प्रताप विद्यामंदिराचा खेळाडू गणेश दिपक महाजन याची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी

 प्रताप विद्यामंदिराचा खेळाडू गणेश दिपक महाजन याची  राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी

 चोपडा दि.०५(प्रतिनिधी):  सांगली येथील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत गणेशने 102 किलो वजनी गटात _तृतीय क्रमांक_ मिळवित *कांस्यपदक* पटकाविले .त्याने सदर स्पर्धेत एकुण 170 किलो वजन उचलून ही भरीव कामगिरी केली.त्याला विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री.एस.एस.पाटील (आप्पा)सर,व क्रीडा शिक्षक श्री.एन.एन.महाजन सर.यांचे मार्गदर्शन लाभले.सदर स्पर्धा ह्या दि.28 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत सांगली येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झाल्या.

या निवडीबद्दल गणेश चे संस्थेचे चेअरमन राजाभाई मयूर,अध्यक्षा शैलाबेन मयूर,उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, सदस्य चंद्रहासभाई गुजराथी,भूपेंद्रभाई गुजराथी,संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांतभाई गुजराथी,उपमुख्याध्यापक एस.जी.डोंगरे,उच्चमाध्यमिक विभागाचे उपप्राचार्य जे.एस.शेलार पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस.एस.पाटील, पी.डी.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी भरभरून कौतुक केले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने