श्री तीर्थक्षेत्र उनपदेव यात्रोत्सवास प्रारंभ
अडावद ता. चोपडा दि.२४(प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्या लगतच्या श्रीक्षेत्र उनपदेव येथील पौष महिन्यातील यात्रोत्सवास गोमुख पुजन आणि भगव्या ध्वजारोहणाने प्रारंभ करण्यात आला.
श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्र उनपदेव यात्रा पौष संपूर्णमहिन्यात भरत असते या यात्रेचा सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांचा हस्ते गोमुख पूजन तर लोकनियुक्त सरपंच भावनाताई पंढरीनाथ माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आला.
दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता
तालुका चोपडा येथील श्री तिर्थक्षेत्र उनपदेव येथे यात्रा उत्सव उद्घाटन गोमुखाचे पूजन सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांच्या तर ध्वजस्तंभ पुजन लोकनियुक्त सरपंच भावनाताई माळीव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच जावेद खान , ग्रामपंचायत सदस्य भारती सचिन महाजन, सविता रामकृष्ण महाजन, आदिवासी सेवक संजीव शिरसाठ चोपडा, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख जीवन माळी , वनपाल कैलास महाजन, गुलाब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातून संपूर्ण जीर्णोद्धार होणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच भावनाताई माळी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपाल कैलास यांनी केले.
यावेळी सचिन महाजन, रियाजअली सैय्यद, नरेंद्र पाटील, अल्ताफखा पठाण, मनोहर देशमुख, माजी सरपंच यासु बारेला वडगांव बु सरपंच बारकु कोळी, उपसरपंच नामदेव पाटील, वटारचे लोकनियुक्त सरपंच गोपाल ठाकरे , मनोहर देशमुख, पंचकचे उपसरपंच किशोर पाटील, पत्रकार जितेंद्र शिंपी, नरेंद्र खांबायत, रियाजोद्दिन शेख ,मंगल इंगळे, सुधाकर चौधरी, अनिल देशमुख, प्रकाश महाजन, संजय पवार, खुशाल पाटील, रमेश ठकरे, संजय देशमुख, भूषण देशमुख, मोहन बारेला, वासुदेव महाजन , रामकृष्ण महाजन, अलियारखा तडवी, अमोल कासार, प्रकाश महाजन, लायकअली काझी, जुनेद खान, शशिकांत कानडे, समाधान ठाकरे, विलास बाविस्कर, धनराज पाटील, निलेश पाटील, शिवदास ठाकरे, संदीप महाजन हवालदार कदिर शेख, अतुल पाटील, सपकाळे, महिला पोलीस सुनीता हटकर यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी वनपाल कैलास महाजन, वनरक्षक हनुमंत सोनवणे गजानन आढवणे वनरक्षक, वनमजुर संजय महाजन, राजु पाटील, दशरथ पाटील, बेलदार, भगीरथ वंजारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी आर माळी यांनी केले.आभार मनोहर देशमुख यांनी मानले.