सेट डिझाईन क्षेत्रात विविध संधी उपलब्ध -सेट डिझायनर हुकूमचंद चव्हाण यांचे प्रतिपादन

 सेट डिझाईन क्षेत्रात विविध संधी उपलब्ध -सेट डिझायनर हुकूमचंद चव्हाण यांचे प्रतिपादन



चोपडा दि.२४(प्रतिनिधी)-येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र या कला संस्थेत *व्यवसायाच्या विविध संधी* उपक्रमांतर्गत सेट डिझाईन या विषयावर तज्ञ सेट डिझायनर *हुकूमचंद चव्हाण(मुंबई)* यांनी फौंडेशन, कलाशिक्षक पदविका, जी.डी.आर्टच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सेट डिझायनर म्हणून कलाप्रवास खडतर असला तरी संयम बाळगला पाहिजे. ड्राॅईंग,व्ह्यू,लोकेशन, डिझाईन, परस्पेक्टीव,फोकस,डेकोरेशन, क्रिएटिव्ह सेन्स् याबाबी परफेक्ट केल्या पाहिजेत,त्याला चिकित्सक निरीक्षण आणि चिकाटीची जोड दिली पाहिजे असे प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले. समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.आशिष गुजराथी यांनी हुकूमचंद चव्हाण यांचा भेटवस्तू,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.परिचय प्रा.सुनिल बारी तर प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले.याप्रसंगी प्रा.विनोद पाटील, डॉ.पृथ्वीराज सैदाणे,उपशिक्षक संजय बारी, कलाशिक्षक पंकज नागपुरे इ.उपस्थित होते.

सेट डिझायनर चव्हाण यांनी फिल्म इंडस्ट्रीसह चंदिगड, हैद्राबाद,दिल्ली, बंगलोर इ.ठिकाणी काम केले आहे.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी भगवान बारी,अतुल अडावदकर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने