श्री.संजयजी शिंदे व श्री युवराज सैंदाणे यांचा समाज रत्न पुरस्काराने सन्मान
धुळे दि.२४(प्रतिनिधी): आदिवासी कोळी जमातीचा इतिहास "विरांगना झलकारी बाई जयंती" उत्सवानिमित्त "विरांगणा झलकारी बाई कोळी,स्त्रिशक्ती सामाजिक संस्था धुळे" यांच्या वतीने कोळी महासंघाचे नाशिक शहर संपर्क प्रमुख तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे नाशिक शहर उपाध्यक्ष मा श्री युवराज सैंदाणे आणि अखिल भारतीय कोळी समाज परिषदचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा आदिवासी कोळी समाज एकता मंचचे अध्यक्ष मा.श्री.संजयजी शिंदे सर या दोघांना "समाज रत्न पुरस्कार 2022" या पुरस्काराने सन्मानित.
नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते, कोळी महासंघाचे नाशिक शहर संपर्क प्रमुख, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे नाशिक शहर उपाध्यक्ष, आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय डेव्हलेपमेंट फाऊंडेशनचे संस्थापक, आदिवासी कोळी समाज एकता मंचचे उपाध्यक्ष तथा बघतोय रिक्षावाला फोरमचे नाशिक समन्वयक मा श्री युवराज सैंदाणे आणि अखिल भारतीय कोळी समाज परिषदचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा आदिवासी कोळी समाज एकता मंचचे अध्यक्ष मा.श्री.संजयजी शिंदे सर या दोघांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना धुळे येथील "विरांगना झलकारी बाई कोळी,स्त्रि शक्ति सामाजिक संस्था धुळे" यांच्या वतीने "समाज रत्न पुरस्कार 2022" हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण जेष्ठ अहिराणी साहित्यिक मा.श्री.सुभाषनाना अहिरे, जेष्ठ संगीतकार आणि दिग्दर्शक मा.श्री.विश्राम आप्पा बिरारी, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच उपजिल्हाधिकारी मा.श्री.भागवत सैंदाणे, पंचायत समिती शिरपुरच्या सभापती मा. सौ वंदना ताई भारत ईशी,दोंडाईचा येथील उद्योजक मा.श्री.मनोज सोनवणे आणि उद्योजक डॉ.मा.विनोद जैन या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थापक अध्यक्षा मा.सौ.गितांजलीताई कोळी प्रस्तावित केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट केले की आपण आपल्या क्षेत्रात योग्य भुमीका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व समाजाला दाखवून दिले. आपले योगदान समस्त महिलांसाठी आणि पिडीत समस्या ग्रस्तासाठी एक प्रेरणा निर्माण करणारे आहे. आपल्या कर्तृत्वाचा सन्मान करतांना "वीरांगना झलकाकारी बाई कोळी,स्त्रिशक्ती सामाजिक संस्था धुळे" यांच्या वतीने "समाज रत्न पुरस्कार 2022" हा पुरस्कार देतांना आम्हास विशेष आनंद होत आहे.
याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.पुष्पाताई शिरसाठ, सौ.लिलाबाई कोळी, सौ. सुरेखाताई कोळी, उपस्थित होते. तसेच मंगलदास कोळी, दिपक मोरे, बापू सोनवणे, हेमराज कोळी, राहुल कोळी, सागर कोळी समाज बांधव उपस्थित होते.