चोपडा पीपल्स बँक चेअरमनपदी चंद्रहास गुजराथी तर व्हाय. चेअरमनपदाची माळ सुनील जैन यांच्या गळ्यात

 चोपडा पीपल्स बँक चेअरमनपदी चंद्रहास गुजराथी तर व्हाय. चेअरमनपदाची माळ सुनील जैन यांच्या गळ्यात


चोपड़ा,दि.२४(प्रतिनिधी) शहरातील नामांकित दि चोपड़ा पीपल्स को आपरेटिव बैंक चोपड़ा या संस्थेची संचालक मंडळ च्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार *चेअरमन पदी  श्री चंद्रहास भाई गुजराथी तर व्हाइस चेअरमन पदी  श्री सुनील भाई जैन (बुरड)*  यांची एक मुखाने निवड करण्यात आली आहे.

दि चोपडा पिपल्स को-ऑप. बँक लि. चोपडा ता. चोपडा जि. जळगाव ची सर्वसाधारण  मतदार संघातील सन २०२२ ते २०२७ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक दि. १३ रोजी पार पडली. यावेळी एकुण ८ जागेसाठी मतदान झाले.  त्यात विद्यमान चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांच्या सहकार पॕनलने बाजी मारत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॕनलचा अक्षरशः धुव्वा उडविला होता.

या निवडणुकीत अग्रवाल अशोक मगनलाल , देसाई सुभाष प्रभाकर ,  गुजराथी आशिष सुभाषलाल , गुजराथी चंद्रहास नटवरलाल , सुनिल शंकरलाल गुजराथी , जैन कैलास शिखरचंद  जैन नेमीचंद सुकलाल , जैन सुनिलकुमार तिलाकचंद  हे उमेदवार विजयी झाले आहेत  तसेच निवडणुकीत चार जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.   आज झालेल्या चेअरमन पदाच्या निवडीत माजी चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ,तर व्हाय चेअरमनपदाची  सुनील जैन यांची अविरोध वर्णी लागली आहे.नवनिर्वाचित चेअरमन -व्हाय चेअरमन यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने