*चोपडा महाविद्यालयात कु. चंचल पाटील चा सत्कार...
चोपडा,दि.२८(प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित,कला शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय चोपडा महाविद्यालयातील इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील कु.चंचल वासुदेव पाटील या विद्यार्थिनीने "आझादि का अमृत महोत्सव" निमित्ताने पंकज विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात तृतीय क्रमांक पटकावला त्या ब्बदल कु. चंचलचे संस्थेच्या सचिव ताईसो डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासो. ॲड.संदीप सुरेश पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी ए सूर्यवंशी उपप्राचार्य प्रा.बी एस हडपे पर्यवेक्षक प्रा.एस पी पाटील समन्वयक ए एन बोरसे तसेच मार्गदर्शक शिक्षक प्रा.एन बी पाटील आदी उपस्थित होते...