अहो..! चक्क ९ पर्यटक धरणाच्या पाण्याच्या वेढ्यात.. काढता काढता नाके नऊ*



 अहो..! चक्क ९ पर्यटक  धरणाच्या पाण्याच्या वेढ्यात.. काढता काढता नाके नऊ*

रावेर,दि.१८(प्रतिनिधी) : सावदा शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील सुकी नदीवरील गारबर्डी धरणावर पर्यटनासाठी गेलेले 9 पर्यटक धबधब्याजवळ पाण्याचा वेढा पडल्याने अडकल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली होती. रात्री दहा वाजेच्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात यश आले आहे.धरणावर अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपरीत्या
बाहेर काढण्यासाठी संतोष दरबार राठोड, इम्रान शाह इकबाल शाह (रा.पाल), रतन भंगी बारेला (रा. गारखेडा), दारासिंग रेवालसिंग बारेला (गारबर्डी), गोविंदा चौधरी (रा. खिरोदा), सिकंदर गुलजार भिल (रा.पाल) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. *नऊ पर्यटकांनी घेतला मोकळा श्वास*
गारबर्डी धरणावर पर्यटनासाठी आलेले गणेश पोपतसिंग मोरे (28, एकनाथ नगर, मुक्ताईनगर), आकाश रमेश धांडे (24, रा. एकनाथ नगर, मुक्ताईनगर), पियुष मिलिंद भालेराव (23, एकनाथ नगर, मुक्ताईनगर), जितेंद्र शत्रूंग पुंड (30, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर), मुकेश श्रीराम धाडे (19, रा.एकनाथ नगर, मुक्ताईनगर), लखन प्रकाश सोनवणे (25, रा. एकनाथ नगर, मुक्ताईनगर), अतुल प्रकाश कोळी (22, रा. एकनाथ नगर, मुक्ताईनगर), विष्णू दिलीप बोरसे (19, रा.एकनाथ नगर, मुक्ताईनगर), रमेश सोनवणे (24, एकनाथ नगर, मुक्ताईनगर) यांना बचाव पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सुखरूपपणे बाहेर काढल्याने या पर्यटकांनी मोकळा श्वास घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने