पाचोऱ्यात रस्ता बांधकाम ठेकेदारांची मनमानी.. पाईप लाईन उखडल्याने शौचालयच बंद..नागरिकांत संताप.. राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षांची न.पा.कडे तक्रार
पाचोरा दि.०९(प्रतिनिधी राजेंद्र खैरनार): शहरातील कृष्णापूरी भागात बांधकाम ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे शौचालयांची पाइपलाइन उखडून रहिवाश्यांना शौचालयांची प्रचंड फसगत झाली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तरी या गंभीर बाबीकडे नगरपालिकेने त्वरित लक्ष घालून नागरिकांनची हेडसांड थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी केली आहे.
श्री.पाटील यांनी
मा.मुख्याधिकारी सो.नगरपालिका पाचोरा,व आरोग्य निरीक्षक नगपालिका पाचोरा, यांना विनंती आहे, की पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील प्रभाग क्र. 13 व 3 ला लागून "शरद ट्रेडींग कंपनी" च्या बाजूला "सार्वजनिक शौचालय चे युनिट असून त्या ठिकाणीं बोरिंग ला पाणी नसून पर्यायी म्हणून पाचोरा नगरपालिके ने त्या शौचालयाच्या युनिट साठी त्रंबकनगर येथील विहिरीतुन पाणी हे युनिट साठी उपलब्ध करून दिले असून त्याची पाईप लाईन व विज केबल तिथून सार्वजनिक शौचालय पर्यंत आणलेली होती. परंतु तिथे आठ ते दहा दिवसापासून राहीलेले अगदी कमी अंतराचे रस्त्याचे खोदकाम ठेकेदाराने करुन ठेवलेले आहे खोदकाम करताना (जेसीबी द्वारे) ने तेथील शौचालयास जाणारी पाण्याची व विज केबल खंडीत झालेली आहे यांनीं काम सुरू केले परंतु तिथून येणारी पाईप लाईन जेसीबी काढून टाकली आहे म्हणून येथील महिला व पुरुष, वयस्कर वृद्धांना व लहान मुलाना शौचालयास जाण्यास खुप त्रास होत असून संबंधीत ठेकेदार याच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून देखील दूर लक्ष केले जात आहे तरी नगरपालिका प्रशासनाने व संबंधित ठेकेदार यांनी त्वरित समज देऊन हे काम आज च्या आज मार्गी लावावे ही विनंती अशी मागणी राष्ट्रवादी चे पाचोरा शहर कार्याध्यक्ष श्री. विनोद हिरामण पाटील यांनी केलेली आहे