*प्रथम आलेला" प्रसाद चौधरी याचा"तेली समाजातर्फे सत्कार*
*चोपडादि.०९(प्रतिनिधी) येथील आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज चोपडाचा विद्यार्धी चिरंजीव प्रसाद अनंत चौधरी 12 वी सायन्स मध्ये *प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण* झाला. *त्यास 91.17 टक्के* गुण मिळाले असून माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनंत लालचंद चौधरी व सौ रत्नाताई अनंत चौधरी यांचा हा सुपुत्र. त्याच्या यशाबद्दल चोपडा तेली समाजाने आनंद व्यक्त केला असून त्याचा चोपडा तेली समाज, जळगाव जिल्हा तेली समाजाच्या वतीने प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष के. डी. चौधरी ,चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक टी. एम. चौधरी ,विश्वस्त नारायण पंडित चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी, देवकांत के. चौधरी, प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी यांनी प्रसाद यांचा सत्कार केला. श्री टी. एम. चौधरी, के .डी. चौधरी यांनी प्रसाद चा गुणगौरव करून त्याच्या आई-वडिलांचा आणि परिवाराचा सत्कार केला. यावेळी इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व विशेष गुण संपादन केलेल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून तेली समाजातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.