चुंचाळे नुतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. बी.जी. महाजन सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न*

 


*चुंचाळे नुतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. बी.जी. महाजन सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न*

चोपडा दि.०९(प्रतिनिधी): तालुक्यातील चुंचाळे येथील नुतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. बी.जी. महाजन सर यांच्या नुकताच सेवा निवृत्त निरोप समारंभ संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
बी.जी.महाजन सर यांनी आपल्या ३२ वर्षांच्या कालखंडात उत्कृष्ट सेवा बजावून अनेक विद्यार्थी घडविले . त्यांच्या स्नेहपूर्ण स्वभामुळे ते विद्यार्थ्यांचे चाहते शिक्षक म्हणून परिचित होते.श्री बी जी महाजन सर यांचा आज वाढदिवस  व सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष  दादासो डॉ. सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेच्या सर्व स्टाफ तर्फे त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने