चोपडा महाविद्यालयाची एचएससी परीक्षेत यशाची परंपरा कायम





चोपडा महाविद्यालयाची एचएससी परीक्षेत यशाची परंपरा कायम                                         

चोपडा दि.०८(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण  मंडळ संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचा एचएससी 2022 परीक्षेचा शाखानिहाय निकाल- वाणिज्य शाखा  99.57%, विज्ञान शाखा  99.41, व कला शाखा 95.09%  असा असून वाणिज्य व विज्ञान  शाखेत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. 

वाणिज्य शाखेत प्रथम मिहिका अचल अग्रवाल 93.17% , द्वितीय पाटील ईशा राजन 92.17%, तृतीय युक्ता संजय पाटील 91.33%. विज्ञान  शाखेत प्रथम प्रसाद अनंत चौधरी  91.17%, द्वितीय  हेमश्री गौरव पाटील 90.67%, तृतीय प्रणव प्रशांत सोनार 89.83%. कला शाखेत प्रथम रिंकू चिंधू  कोळी 79.17%, द्वितीय भाग्यश्री एकनाथ कोळी 78.50% , तृतीय  हर्षदा प्रविण पाटील  78.33%.  वाणिज्य शाखेची मिहिका अग्रवाल  हिला गणित व अकौंटसी विषयात 100 पैकी 100 गुण मिळालेअसून  वाणिज्य शाखेची युक्ता पाटीललाही गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  अॕड संदीप सुरेश  पाटील , उपाध्यक्ष आशा विजय पाटील , सचिव  डाॕ स्मिता संदीप पाटील , संचालक मंडळ , प्राचार्य डाॕ डी ए सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा डाॕ ए एल चौधरी , उपप्राचार्य प्रा डाॕ के एन सोनवणे , उपप्राचार्य प्रा डाॕ व्ही टी पाटील , उपप्राचार्य प्रा एन एस कोल्हे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा बी एस हळपे , पर्यवेक्षक प्रा एस पी पाटील रजिस्ट्रार डी एम पाटील समन्वयक प्रा ए एन बोरसे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने