प्रताप विद्या मंदिर बारावीच्या विज्ञान शाखेत प्रगती अडावदकर सर्वप्रथम तर जय लाड द्वितीय*

 


*प्रताप विद्या मंदिर बारावीच्या विज्ञान शाखेत प्रगती अडावदकर सर्वप्रथम तर जय लाड द्वितीय

चोपडा दि.०९ (प्रतिनिधी) येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराने बारावीच्या निकालाची उज्ज्वल व गौरवशाली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. जगात कोरोनाचे सावट असूनही चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात 12 वी च्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त वातावरणात प्रयत्नांची पराकाष्ठा करून भरघोस यश संपादन केले आहे.

विद्यालयाचा सरासरी 93% निकाल लागला असून त्यात विज्ञान विभागाचा 99%, कला विभागाचा 87%, वाणिज्य विभागाचा 100% निकाल लागलेला आहे. विज्ञान विभागात प्रथम अडावदकर प्रगती प्रदीप ( 79.33%), द्वितीय लाड जय जगदीश (78.33% ) तृतीय पिंगळे गायत्री धनराज ( 76% ), व वाघ रोशन विजय (76%) तसेचकला विभागात प्रथम बाविस्कर कपिल सुकलाल ( 87% ) द्वितीय शहा तृप्ती तेजस ( 79%) तृतीय मिस्तरी सरिता मनोहर (77.17 ) तरवाणिज्य विभागात प्रथम पाटील वैष्णव सत्तेसिंग ( 79.33% ) द्वितीय पाटील निखिल मच्छिंद्र ( 72%) तृतीय माळी हर्षदा राजू (70.67% ) तसेच संस्थेच्या एच एस सी व्होकेशनल विभागाचा निकाल 85% लागला आहे.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन राजाभाई मयूर, अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, सचिव माधुरीताई मयूर, तसेच संचालक चंद्रहासभाई गुजराथी, भुपेंद्रभाई गुजराथी व रमेश जैन तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक आर आर शिंदे, उपमुख्याध्यापक प्रशांतभाई गुजराथी, पर्यवेक्षक एस जी डोंगरे, श्रीमती माधुरी पाटील, एस एस पाटील, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, व शिक्षक बंधू भगिनी आदींनी अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने