*पंकज महाविद्यालयाच्या खेळाडूची विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड*
चोपडा दि.२०( प्रतिनिधी) :-- पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित , पंकज कला व विज्ञान महाविद्यालयातील एस वाय बी ए ची विद्यार्थिनी कु.अंकिता प्रवीण पाटील या विद्यार्थीनीची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे.
या खेळाडूंने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव,धुळे ,नंदुरबार व एरंडोल या चार विभागात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवले.
त्यामुळे तिची विद्यापीठ संघात निवड झाली .पुढील आंतरविद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धा या पौर्णिमा विद्यापीठ जयपूर (राजस्थान) येथे २१ ते २५ जून २०२२ या काळात होणार आहे. अंकिता पाटील हिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ पौर्णिमा विद्यापीठ जयपूर येथे रवाना झाला आहे.
अंकिता पाटील हिचे पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले,उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमोडे , एम व्ही पाटील ,व्ही आर पाटील ,प्राचार्य मिलिंद पाटील, प्राचार्य संदीप वन्नेरे, महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.