कुरकुटवाडी जिल्हा परिषद शाळेची आगेकूच हायटेक शाळेकडे
संगमनेर दि.१२( प्रतिनिधी विशाल कुरकुटे)*संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरकुटवाडी शाळेचे रूप पालटलेले आहे* जिल्हा परिषद शाळा आदर्श ठरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. इंग्लिश मीडियम शाळेच्या पावलावर पाऊल ठेवत जिल्हा परिषद शाळा हायटेक होताना दिसत आहे. लोकांचा असा समज असायचा, की जिल्हा परिषद शाळा म्हणजे जुन्या पडक्या खोल्या अशा स्वरूप असणाऱ्या शाळा तसेच रंग नसलेली भिंत असे चित्र लोकांसमोर उभे राहायचे, मात्र कुरकुटवाडी येथील हा जिल्हा परिषद शाळेचा चेहरा बदलण्याचे काम मुंबईकर व पुणेकर फंड मित्र मंडळ ग्रामस्थांनी मिळून केले आहे. तसेच शाळेतील १ ली ते ४ वीच्या विद्यार्थ्यांचे संविधान प्रास्ताविका तोंडपाठ आहे. तसेच विद्यार्थ्यांना सेमी इग्रजी माध्यमाप्रमाणे जिल्हा परिषद शाळे तर्फे मुलांना ड्रेसही देण्यात आला आहे. हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा बदल करण्यामागे गावातील लोकांचा मोठा सहभाग पाहावयास मिळत आहे. यामुळे लोकांनी दाखवलेला सहभाग या शाळेला नवे रूप देण्यास यशस्वी झाले आहे. याचबरोबर या मुंबईकर पुणेकर फंड मित्र मंडळ कुरकुटवाडी येथील ग्रामस्थांनी शाळेसाठी आर्थिक योगदान दिले आहे. या शाळेमध्ये वेळोवेळी केंद्रप्रमुख रावजी तबा केसकर विस्ताराधिकारी कैलास धोत्रे गटशिक्षणाधिकारी के के पवार मुख्याध्यापिका मंगला रखमजी रहाणे उपाख्यापिका सौ निर्मला लक्ष्मण वाळुंज यांचे कुरकुटवाडी येथील शिक्षणाचा दर्जा अतिशय चांगल्या प्रतीचा आहे या शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मुले टॉप वर आहेत प्रकाशझोतात आहेत म्हणून मला माझ्या या मराठी शाळेबद्दल विशेष आकर्षण आहे अशा कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका श्रीमती मंगला रखमाजी रहाणे व उपाध्यापिका श्रीमती निर्मला लक्ष्मण वाळुंज त्याचबरोबर शाळेच्या पटसंख्या शंभर टक्के टिकून तात्पर्य म्हणजे मुख्याध्यापिका यांनी केले आहे असल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेसाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नवनाथ कुरकुटे गणेश विठ्ठल सहाणे सर्व सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन असते . मुंबईकर पुणेकर समस्त ग्रामस्थ यांनी शाळेसाठी वर्गखोलीतील फरशी, पाणी पिण्यासाठी पाण्याचे जार, साहित्य ठेवण्यासाठी कपाट, क्रीडासाहित्य, पुस्तके, तसेच रंगकामासाठी चौदाव्या वित्त आयोगातून आर्थिक मदत, तसेच कमी पडलेल्या निधीसाठी रंगकामासाठी लोकवर्गणीतून काम पूर्णत्वाकडे मदत झाली पाहिजे स्पीकर्स, प्रिटंर, शाळेतील मैदानामध्ये सुशोभीकरण केले आहे. संगमनेर तालुक्यातील ही शाळा आदर्श निर्माण करत आहे