्चोपडा महाविद्यालय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2021 जी-पॅट परीक्षेत यश
चोपडा दि.२२(प्रतिनिधी) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलितश्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र चोपडा महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2021 जी-पॅट परीक्षेत पात्र होऊन यश मिळवले.
ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT) ही एम.फार्म प्रोग्राम्समध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेत हर्षदा जैन,सिद्धांत निकम,रोहित एस. पाटील,प्रफुल अरुण पाटील, प्रतिक पाटील, धनंजय पाटील यांनी यश मिळवले.
वरील सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे अध्यक्ष अॅड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा सौ.आशाताई पाटील, सचिव सौ.डॉ.स्मिताताई संदीप पाटील, प्राचार्य डॉ.गौतम पी वडनेरे, रजिस्ट्रार प्रफूल्ल बी मोरे व जी-पॅट समितीचे प्रमुख डॉ ए. व्ही पाटील आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनींनी अभिनंदन केले.
सर्व शिक्षकांनी तसेच वेळोवेळी इतर प्रथितयश मार्गदर्शक यांनी घेतलेले प्रयत्न आज मुलांना प्रेरक ठरले
शैक्षणिक धोरण व अभ्यासु व्यासंग हेच ह्या यशाचे गमक आहे
महाविद्यालयात सुसज्ज शैक्षणिक सुविधांची उपलब्धता हे मा. व्यवस्थापन मंडळाच्या दूरदर्शी धोरणामुळे शक्य होत आहे
विद्यार्थ्यांना यश मिळाल्यामुळे उच्चं शिक्षण आणि संशोधनाकडे वळण्याचा त्यांचा कल आहे.