*१९९५ ला गणपती बाप्पा नंतर आता महादेवाचे सेवेकरी नंदीची मूर्ती पितेय पाणी व दुध.. मंदिरांमध्ये भाविकांची तोबा गर्दी.. हा चमत्कार नसून अंधश्रद्धा..! कॅपिलरी ऍक्शन आणि सरफेस टेन्शन आदी गुणधर्मांमुळे होतोय हा प्रकार अभ्यास तज्ज्ञांचे मत..*
चोपडा/गलंगी दि.०५ (प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी)देवांचे देव भगवान महादेवांचे सेवेकरी नंदी आज दि.०५ मार्च रोजी सर्वत्र दुध व पाणी पीत असल्याची चर्चा असल्याने शिव शंकर मंदिरात तोबा गर्दी उसळली आहे. चक्क चमच्याने दुध व पाण्याचे तीर्थ गिळंकृत करीत असल्याने हा दैवी चमत्कार का काही शास्त्रीय कारण असावं याबाबत अनभिज्ञता आहे.मात्र भाविकांची श्रध्दा दृढ असल्याने महिला वर्गाने गर्दी केल्याने मंदिर फुल्ल झाली आहेत.
चोपडा शहरातील हरेश्र्वर महादेव मंदिर, पूर्णकेश्वर महादेव मंदिर,जीनमधील महादेव मंदिर, पंकज स्टाफ जवळील महादेव मंदिर,अरुण नगरातील महादेव मंदिरासह शहरातील व तालुक्यातील सर्वच मंदिराबाहेरील नंदी देवता चम्मच चम्मच ने पाणी व दुध प्राशन करीत असल्याचे वृत्त सोशिअल मिडिया द्वारे व्हायरल होताच घोडगाव,गलंगी,कुसूबा, अनवर्दे खुर्द,वाळकी , बुधगावसह सर्वत्र नंदीची मूर्ती दूध पित असल्याची चर्चा सुरू होती.
महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती ही आज सकाळपासून अचानक पाणी पिऊ लागल्याचे दिसून आल्याने येथे भाविकांची गर्दी उसळली आहे. तर या मागे शास्त्रीय कारण असून हा चमत्कार नव्हे तर विज्ञानाच्या सिध्दांतानुसार होत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
१९९५ साली गणपतीच्या मूर्ती दूध पितअसल्याची माहिती आल्यामुळे उडालेला गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण हे अनेक दिवस कायम होते. २१ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा याची माहिती समोर आली होती. अनेक दिवसांपर्यंत याबाबत दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. शेवटी भौतीकशास्त्रातील कॅपिलरी ऍक्शन या गुणधर्मामुळे गणपतीच्या मूर्ती दूध पित असल्याचे शास्त्रज्ञांनी जाहीर केले होते. तेव्हापासून अनेकदा असे प्रकार घडले आहेत. नंदीच्या मूर्तीजवळ चमच्याने पाणी घेऊन गेले असता ते मध्ये शोषले जात
असल्याचे भाविकांना आढळून आले
असून याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, काही तासांमध्येच ही वार्ता परिसरात पसरल्यानंतर शेकडो भाविकांनी चिनावल येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी धाव घेतली आहे. अनेक भाविकांनी तेथील नंदीच्या मूर्तीला पाण्याने भरलेला चमचा लावल्यानंतर हे पाणी मूर्तीमध्ये शोषले जात असल्याची अनुभूती घेतली आहे. यामागे दैवी चमत्कार असल्याची भाविकांची भावना आहे. दरम्यान, दुपारी आलेल्या माहितीनुसार नंदीची मूर्ती पाणी पित असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडू लागल्या आहेत.
तर मध्यप्रदेशातील इंदूर येथील एका शिव मंदिरातही हा प्रकार घडत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.दरम्यान, या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने काही जाणकारांशी चर्चा केली असता गणपती दूध पित असल्याच्या प्रकरणातील कॅपिलरी ऍक्शन आणि सरफेस टेन्शन आदी गुणधर्मांमुळे हा प्रकार होत आहे. यामागे दैवी कारण नसून वैज्ञानिक गुणधर्म आहे. मात्र कुणाच्याही भावना आणि श्रध्दा न दुखावता हा प्रकार स्वीकारावा असे आवाहन करण्यात आले आहे.