*हातेड-बुधगाव रस्ता कामांचा नारळ फुटला.. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांचा निधी म्हणजे नुसती गंगा नसून सागरा एव्हढे विशालच खेड्या- पाड्यातून प्रतिक्रिया..५ कोटी ५५ लाखांच्या विकास कामांचे उद्घाटन*
चोपडा दि.२०(प्रतिनिधी)
मा.आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा) यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले विकास कामांचा भुमिपुजन सोहळा
मा. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार, चोपडा विधानसभा) यांच्या शुभहस्ते व प्रमुख अतिथी : मा.प्रा.श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे (माजी आमदार, चोपडा विधानसभा तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख रावेर लोकसभा) यांच्या उपस्थितीत पाच कोटी ५५ लाखांचा विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला
यावेळी विटनेर ते वाळकी दरम्यान ३ पुलांचे बांधकाम करणे.२७५.०० लक्ष (दोन कोटी पंच्याचर लाख रु.)हातेड बुधगांव दरम्यान ७.१०० कि.मी रस्त्याची सुधारणा करणे.२५०.०० लक्ष (दोन कोटी पन्नास लाख रु.)व
गलवाडे फाट्याजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे.
३०.०० लक्ष (तीस लाख रुपये)अशा तीन कामांचा शुभारंभ झाला
याआधी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड मार्फत व शेतकी संघ चोपडा यांच्या संयुक्त हरभरा खरेदी शुभारंभ कार्यक्रम पार पडल्यानंतर लगेचच विकास कामांचा नारळ फुटला. याप्रसंगी जिप सदस्य हरिश पाटील माजी उप नगरअध्यक्ष विकास पाटिल, तालुका संघटक सुकलाल कोळी, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, नरेंद्र बाविस्कर, ज्ञानेश्वर अहिरे,धिरज गुजराथी प्रताप पाटील ,योगेश पाटील हरिष पवार, ज्ञानेश्वर अहिरे, शेतकी संघाचे चेअरमण दुर्गादास पाटील ,बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, संचालक सुनिल पाटील शेखर पाटील, शेतकी संघाचे सचिव राहुल पाटील ,
कैलास पांडुरंग शिरसाठ अनवर्दे, गणेश पाटील मालखेडा, पंडित शिरसाठ मा सरपंच बुधगाव, ज्ञानेश्वर अहिरे सरपंच हातेड,नंदु शिरसाठ,नथ्थु बोरसे,धनंजय साळुंखे अनवर्दे व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते