हिंगोणे येथे शॉर्टसर्कीटमुळे हरभ-याच्या गंजीला लागली आग २०क्विटल हरभरा जळून खाक..गरीब आदिवासी शेतक-यावर सुलेमानी संकट !
चोपडा दि.२१ (प्रतिनिधी):राबराब करणा-या शेतक-यावर कोणते सुलेमानी संकट येईल याचा नेम नाही.धरणी मातेने दिले आणी अग्नीने सर्व नेले, एकी कडे उन्हांचे चटके अन् दुसरी कडे अागीचे चटके. या दोन्ही निसर्गाच्या तत्वाच्या कोपापुढे शेतकरी पुर्णत: अपयशी झाला आहे. तरी खचून न् जाता दोन हात करायला तयार असणारा शेतकरी आज हळूहळू तळाशी जातोय .
चोपडा तालुक्यातील मौजे हिगोंणा शिवारात भर दुपारी शॉर्ट सर्कीटमुळे दोन एकर शेतातील हरभ-याच्या गंजीला आग लागून 20 क्विटंल आसपास हरभरा जळून खाक झाला असून यामुळे शेतक-याला लाखो रूपयाचे आर्थीक नुकसानीचा फटका बसला आहे.
हिंगोणे येथील रहिवासी लताबाई भिमराव भिल्ल यांचे मौजे हिगोणा शिवारातील गट नं. ५८/ १/२ ०. ८१ आर एवढ्या क्षेत्रात हरभरा हे पिक पेरणी केली होती. आज दि. २० मार्च रोजी डॉलर हरभरा कापणी करून एका ठिकाणी गोळा करून ठेवण्यात आला होता. या गटातील शेतात तीन गंज्या लावलेल्या होत्या त्या पैकी आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका गंजीला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याने हातातोंडाशी आलेला घास अग्निमुखात गेला या सोबत शेती उपयोगी पाईप ईत्यादी साहीत्य जळून खाक झाले. असून शेतक-याला आर्थीक नुकसानीचा फटका बसला आहे. समक्ष घटनास्थळी नुकसानीचा पंचनामा तलाठी कुलदीप पाटील यांनी केला असून याकामी कोतवाल विकास पाटील यांनी मदत केली.
आग विजवण्यासाठी अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी आल्याने लवकर आग विजविण्यास मदत झाली. तसेच ग्रामस्थांनी देखील या ठिकाणी मदतकार्य केले .