पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 100 % निकालाची परंपरा कायम राखून प्राप्त केले घवघवीत यश....
चोपडा( प्रतिनिधी) :--- सी बी एस ई बोर्डाने नुकताच प्रथम सत्र परीक्षेच्या निकाल जाहीर केला आहे. त्यात चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
त्यात प्रथम 3 मध्ये येणारे विद्यार्थी
प्रथम आशुतोष अमिताभ अग्रवाल 97.5% , व्दितीय दक्ष जितेंद्र बोथरा 96% तर तृतीय क्रिष्णा सुरेश बाहेती 95% यांनी क्रमांक मिळविले आहेत.
या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक व रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज बोरोले, नारायण बोरोले, गोकुळ भोळे, पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटिल , पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही.पाटील ,पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, कल,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालया चे प्राचार्य डॉ महादेव वाघमोडे , पंकज बालसंस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील, पंकज इंग्लिश मीडियमचे प्राचार्य संदीप वन्नेरे तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .