स्व.दलाल सरांच्या उपस्थितीने मिरवणुकीत शांततेचा विश्वास -प्रा.अरुणभाई गुजराथी


 स्व.दलाल सरांच्या उपस्थितीने  मिरवणुकीत शांततेचा विश्वास

-प्रा.अरुणभाई गुजराथी 

चोपडा दि.०६(प्रतिनिधी)-स्व.दलाल सरचे व्यक्तिमत्त्व नव्या पिढीला सामर्थ्य देणारे होते. त्यांच्या निधनाने सारं शहर सुन्न झाले.ते धार्मिक पण सहिष्णू होते. आक्रमक नसलेले नेतृत्व होतं.दलाल सर गणेश विसर्जन मिरवणुकीत असले म्हणजे आमच्या सारख्यांना शांततेचा विश्वास निर्माण व्हायचा.समाजात सेवाभावी व समर्पित व्यक्ती दलाल सरांची प्रतिमा त्यांच्या कार्यामुळे निर्माण झाली असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.  अरुणभाई गुजराथी यांनी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये कार्य करणारे प्रकाश केशव दलाल यांचे दि.२५ जानेवारीला निधन झाल्यानंतर आज झालेल्या शोकसभेत प्रा.गुजराथी बोलत होते.

विश्व हिंदू परिषद धोंडू अण्णा माळी,रा.स्व.संघाचे प्रांत पदाधिकारी  स्वानंद झारे यांनी स्व.दलाल यांना श्रध्दांजली वाहतांना त्यांच्या कार्याचा गौरव केला.समजाप्रती त्यांनी केलेले काम अजरामर राहिल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी स्व.दलाल यांचे निकटचे स्नेही ए.के.बोहरी,माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, माजी शिक्षक आमदार प्रा. दिलीपराव सोनवणे,माजी आ.कैलास पाटील, बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे प्रा.एस.टी.कुलकर्णी, प्रताप विद्या मंदिराचे पर्यवेक्षक प्रशांत गुजराथी, नागलवाडीचे मुख्याध्यापक आर.बी.पाटील,आर.एच.पाटील (मामलदे),नगरसेवक डॅा.रवींद्र पाटील,चोपडा सामाजिक व सांस्कृतिक समितीचे भटू पाटील, नगर वाचन मंदिराचे कार्यवाह गोविंद गुजराथी,धनंजय कुलकर्णी (येवला) ,भारतीय किसान संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत नेवे,पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी अत्यंत भावूक मनोगत व्यक्त केले.

स्व.दलाल सरांचे सुपूत्र भुषण दलाल आणि भगिनी श्रीमती कमल याांनी प्रतिमेचे पूजन केले. तर गित अवधूत ढबू यांनी सादर केले.

यावेळी शिक्षक नेते आर.एच.बाविस्कर, भाजप शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल,जिल्हा भाजप उपाध्यक्ष  राकेश पाटील,भाजप नेते चंद्रशेखर पाटील, सुभाष देशमुख, जितेंद्र नेवे (साकळी),सनातन संस्थेचे यशवंत चौधरी,नगरसेवक राजाराम पाटील,प्रवीण जैन,मुन्ना शर्मा,डॅा.सुभाष देसाई, डॅा.परेश टिल्लू,डी.बी.पाटील,प्रा.क्रांती वाघ,डॅा.आशिष गुजराथी,नितिन गुजराथी,  यांंच्यासह शिक्षण क्षेत्रातील मंडळी,संंघ स्वयंसेवक,नातलग,आप्तेष्ठ ,परिवारजन उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौरभ नेवे यांनी केले.तर कुलभूषण दलाल यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेमराज पाटील, मनोज विसावे,कुशल गुजराथी,प्रवीण जैन,यशवंत चौधरी, लक्ष्मण शेटी,सुनिल जैस्वाल,उल्हास गुजराथी, गिरिष माळी, महेंद्र शेटी,गौरव सोनार,शिवदास बारी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने