परिवहन विभागाचा मार्च महिन्याचा तालुकानिहाय दौरा जाहिर
जळगाव, (प्रतिनिधी) दि. 27 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत मार्च महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
मार्च-2022 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण
अमळनेर-पहिला व चौथा / पाचवा – सोमवार व गुरुवार, जामनेर-दुसरा बुधवार, पाचोरा- बुधवार (पाचवा), भुसावळ-पहिला, दुसरा व (पाचवा) गुरुवार, चाळीसगाव-पहिला, दुसरा व चौथा शुक्रवार, यावल - दुसरा मंगळवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा - दुसरा सोमवार, रावेर – (पाचवा) मंगळवार, बोदवड - तिसरा बुधवार, पारोळा - तिसरा सोमवार, एरंडोल – चौथा मंगळवार, मुक्ताईनगर- तिसरा मंगळवार, वरणगाव – चौथा बुधवार याप्रमाणे दौरा राहील.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.