*सूरमाज फाऊंडेशन तर्फे प्रजासत्तक दिन साजरा
चोपडा दि.२६(प्रतिनिधी): प्रजासत्तक दिन हा आपल्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि हा दिवस साध्य करण्यासाठी आपल्या अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आणि कुटुंबाची आहुती दिली आहे आणि हा दिवस लक्षात ठेवणे आणि देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. म्हणूनच आज 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्तक दिनानिमित्त सूरमज फाउंडेशन चोपडा यांच्या कार्यालयात हाजी उस्मान शेख साहब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शोएब शेख, जुबेर बैग, अबुललौस शेख, डॉ रागीब, जियाउद्दीन काजी साहब आणी सूरमाज फाउंडेशन चे सहकारी उपस्थित होते.