*प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगाव यांचे फेसबुक पेजचे विमोचन *
धरणगाव:दि.26(प्रतिनिधी)- आज दिनांक २६/०१/२०२२ रोजी जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मूकबधिर निवासी विद्यालय ,मतिमंद निवासी अनिवासी विद्यालय ,मूक बधिर निवासी कार्यशाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला याप्रसंगी ध्वजारोहण मा.श्री. अशोकजी श्रावण पाटील (सेवानिवृत्त शिक्षक माजी चेअरमन ग स सोसायटी जळगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तदनंतर मा.श्री.धनंजय भावराव सोनवणे (आदर्श शिक्षक हातेड) व सहसचिव डॉ.तन्वी पाटील बि.ए.एम.एस.(आयुर्वेद)पदवीत विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल तसेच संस्थेतील कर्मचारींच्या विशेष गुणसंपन्न केलेल्या पाल्यांचे सत्कार करण्यात आले. यात कलाशिक्षक किशोरराव पाटील यांची कन्या निकिता पाटील यांची इंदिरा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट प्लेसमेन्ट मधून बजाज अलायन्स कंपनीत सिनियर मॅनेजर या पदी नियुक्ती झाल्याबद्दल तर लिपिक अनंत जाधव यांची कन्या तेजल जाधव बी.ई.सिव्हिल इंजीनियरिंग पदवीमध्ये विशेष प्राविण्य मिळविल्या बद्दल तसेच काळजी वाहक कल्पनाबाई ठाकरे यांचा चिरंजीव तुषार ठाकरे एम.ए.सि.बी मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच उपक्रम शील शिक्षक मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.ऋषिकेश जाधव सर यांच्या संकल्पनेतून संस्थेचे JSPM Dharangaon फेसबुक पेज चे विमोचन धनंजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी संस्थाध्यक्ष मा.श्री.बापूसो.आर.डी.पाटील साहेब ,सचिव मायाताई पाटील, उपाध्यक्ष पुरुषोत्तम साळुंके विश्वस्त प्रदीप सोनवणे,जिमेशभाई पटेल यांची उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव,मूकबधिर कार्यशाळेचे निर्देशक राकेश पाटील ,नंदू पाटील ,दीपक जाधव ,किशोर पाटील, चंद्रराव सैंदाने,अनंत जाधव, दिलिप पाटील ,उमेश पाटील ,अरिफ शहा ,अमोल पाटील ,राकेश पाटील ,कल्पनाबाई ठाकरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष भडांगे यांनी तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन आर एच पाटील सर यांनी केले.