रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांना पॉल हॅरिस फेलो सन्मान...*

 




*रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांना पॉल हॅरिस फेलो सन्मान...*

  चोपडा दि.०१ (प्रतिनिधी) :---

       रोटरी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा पॉल हॅरीस फेलो हा सन्मान रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले  यांना नुकताच जाहिर झाला आहे. हा सन्मान रोटरी फाऊंडेशन या संस्थेस 350 अमेरिकन डॉलरचे योगदान देणाऱ्या व्यक्तींस दिला जातो.

           रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हातात घेतल्यापासून विविध समाजपयोगी कार्य केली आहेत त्यात रामपुरा भागात वृक्षारोपण , रक्तदान शिबिराचे आयोजन, आदिवासी भागातील कुपोषित बालकांना व मातांना सक्षम बनविणे, गरोदर मातांना / महिलांना समुपदेशन करणे व औषधीचा पुरवठा करणे , मुलींना स्वस्वरंक्षणाचे धडे / प्रशिक्षण देणे , कोविड लसीकरण इत्यादी उपक्रम हाती घेतले आहेत.

        रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांना पॉल हॅरीस फेलो सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन रमेश मेहेर ( डिस्ट्रिक्ट प्रांतपाल ) , राजेश मोर ( असि. गव्हर्नर ) , एम डब्ल्यू पाटील (एनक्लेव चेअर ) , सचिव रोटे प्रवीण मिस्त्री , खजिनदार रोटे भालचंद्र पवार यांसह रोटरी च्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने