*शब्दांची धार लेखणीचा वार असलेला समाजवादी नेता : स्वर्गीय पांडुरंग बापू*


 



*शब्दांची धार लेखणीचा वार असलेला समाजवादी नेता : स्वर्गीय पांडुरंग बापू* 


[ *लेखक : श्री.नंदलाल मराठे (पत्रकार) मुख्य संपादक खान्देश अस्मिता* *व संस्थापक अध्यक्ष नानासाहेब मराठे प्रतिष्ठान चोपडा* ]


 चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द|| येथील एक झुंजार नेतृत्व म्हणजे स्वर्गीय पांडुरंग नारायण शिरसाठ हे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येऊन ठाकते.आपल्यातून परलोकी जाऊन त्यांना आज सहा वर्ष झाली.त्यांचे आज सहावे पुण्यस्मरण त्या निमित्ताने स्व.पांडू बापू यांना श्रद्धांजली पर हा माझा लेख प्रपंच…


             तापी काठी असलेल्या अनवर्दे बु|| या गावाचा स्व.पांडू बापू म्हणजे उगवता सुर्यच.समाजवादी विचारांचा व “शब्दांची धार आणि लेखणीचा वार” असलेला जेष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक चौखंबा या त्यांच्या स्वमालकीच्या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादक होते.त्यांच्या लेखन शैलीने त्यांनी त्या काळात अनेकांचे कपडे आपल्या धारदार लेखणीने उतरविल्याचे आज देखील दाखले दिले जातात.त्यांनी दैनिक जनशक्ती चे संस्थापक संपादक स्वर्गीय ब्रिजलाल पाटील,माजी रेल्वे मंत्री स्वर्गीय जॉर्ज फर्नांडिस,शहादाचे माजी आमदार स्वर्गीय पी के आण्णा पाटील,स्वर्गीय ओंकार आप्पा वाघ यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते.त्यामुळे त्यांची वैचारिक पातळी,विचारधारा ही कुठल्याही प्रलोभनांना अथवा दबावाला कधीच बळी पडली नाही.गावात देखील अनेक गोरगरिबांना त्यांनी अन्न,वस्त्र,निवारा यासाठी शक्य ती मदत केली होती. त्यांच्या या उदात्त व मदतीला धावून जाणाऱ्या स्वभावामुळे दि.०१/१२/२०१५ रोजी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती.यावरून त्यांची लोकप्रियता माझ्यासह त्यादिवशी अनेकांना व गावकऱ्यांना देखील दिसून आली होती.

          चोपडा तालुक्यातील खंबीर नेतृत्व म्हणजे स्वर्गीय पांडुरंग बापू शिरसाठ व स्वर्गीय दा.का.केंगे यांच्याकडे बघितले जात होते.हे दोघ नेते म्हणजे एका नाण्याची दोन बाजू असे त्यांना संबोधिले जायायचे.त्यांच्या या मैत्रीपूर्ण जोडीची किमया संपुर्ण महाराष्ट्राला ज्ञात होती.

स्वर्गीय पांडुरंग बापू यांनी १९७० च्या दशकात आदिवासी बांधवांना जल,जंगल यावर त्यांना अधिकार मिळावा यासाठी “जबरन ज्योत” आंदोलन केले होते सदरचे आंदोलन हे त्यावेळी देशभर करण्यात आले होते.चोपडा तालुक्यातील पांढरी हे आदिवासी पाडा वसविण्यासाठी त्यांचे मोलाचे प्रयत्न आहेत.कोणत्याही आदिवासीकडून एक रुपया न घेता स्वतः पदरमोड करून स्व.पांडुरंग बापू या आदिवासी महानायकाने आदिवासी भागातील बांधवांची खरी सेवा केल्याचे आजही या भागात नामोल्लेख होतो.त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी मकसुदअली जहागिरदार,लक्ष्मण चौधरी,रामभाऊ सोनार,सुभाष वानखेडे,कै.धनाभाऊ पावरा,कै.भिमसिंग बारेला,कै.वेस्ता पांडु,कै.कलचंद हिरा बारेला,कै.सुरभान वेलजी बारेला,कै.भुऱ्या बाबा पावरा यांचे सहकार्य होते.

                स्वर्गीय पांडुरंग बापू यांनी सन १९९५ साली जनता दला कडून चोपडा विधानसभा निवडणूकही लढविली होती.

त्यात त्यांना २७१८,स्व.दा.का.केंगे यांना ४०७३ अशी मते मिळाली होती यात प्रा.अरुणभाई गुजराथी यांचा विजय झाला होता. हे लिहीण्याचा उद्देश असा की,स्व.पांडू बापू व स्व.दा.का.केंगे या जोडीने मनाशी निश्चय केला की ते कधीही माघारी परतणे अथवा दिलेला शब्द फिरविणे या गोष्टी करीत नव्हते हा महत्वाचा बाणा त्यांचा अंगी होता.त्यांच्या या जाण्याने सामाजिक हानी जरी झाली असली तरी त्यांची मुले संजीव शिरसाठ, महेश शिरसाठ, कैलास शिरसाठ हे ती पोकळी भरून काढण्याचे काम आपल्या सामाजिक कार्यातून करीत आहेत.शेवटी एकच 

सांगावसे वाटते स्वर्गीय पांडुरंग बापू ही व्यक्ती कधी न येणारं…बापूंचे नाव राज्यात गर्जत राहणार… गर्जत राहणार…


 [ *लेखक : श्री.नंदलाल मराठे (पत्रकार) मुख्य संपादक खान्देश अस्मिता* *व संस्थापक अध्यक्ष नानासाहेब मराठे प्रतिष्ठान चोपडा* ]

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने