पेट्रोल - डिझेल व घरगुती गॅस दरवाढीविरोधात चोपड्यात युवासेनेचे निवेदन



 




पेट्रोल - डिझेल व घरगुती गॅस दरवाढीविरोधात चोपड्यात युवासेनेचे निवेदन

चोपडा दि.२ ( प्रतिनिधी )  आज रोजी युवासेना चोपडा तालुक्याचा वतीने निवेदन देण्यात आले 

पेट्रोल - डिझेल व घरगुती गॅस दरवाढी वर क्रेंद्र सरकारने नियंत्रण ठेवण्या बाबत .....

    युवासेना चोपडा तालुका आपणांस उपरोक्त विषयान्वये निवेदन देतो की सध्या राज्यात व देशभरात पेट्रोल - डिझेल घरगुती गॅस सिलेंडर चे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले आहे. मध्यमवर्गीय लोकांना वाहने वापरणे व घरातील गॅस सिलेंडर वापरणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल च्या किंमती कमी जास्त होत असल्याने महागाई हि गगनाला भिडत आहे या माहागाईने सर्व सामान्याची दिवाळ काढले आहे आणि केंद्र सरकार हे मुग गिळुन बसल्या सारखे आहे महागाईचा भडका कमी न झाल्यास युवासेना पूर्ण राज्यभरात उग्र आंदोलन उभे करेल. 

          तरी याद्वारे आम्ही नम्र निवेदन देतो की केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे घरगुती गॅस सिलेंडर चे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दयावा.असे निवेदन देण्यात आले               

   दिपक चौधरी युवासेना उपजिल्हा प्रमुख गोपाल चौधरी युवासेना तालुका प्रमुख देवेंद्र बारी युवासेना शहर प्रमुख डाॅ.रोहन पाटील युवासेना शहर प्रमुख नंदु गवळी युवासेना शहर संघटक मंगेश पाटील किरण महाजन अजय मराठे विजय माळी राजु माळी राहुल माळी विजय वैदकर जितेंद्र बारी जिगर बडगुजर तुषार पाटील युवासैनिक उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने