अभिनेत्री कंगना राजावत यांच्यावर गुन्हा दाखल करा तालुका कॉग्रेस कमेटीने बदनापुर येथे दिले निवेदन





 अभिनेत्री कंगना राजावत यांच्यावर गुन्हा दाखल करा  तालुका कॉग्रेस कमेटीने   बदनापुर येथे दिले निवेदन

बदनापुर दि.१३ (प्रतिनिधी)अभिनेत्री कंगना राजापत यांनी सांगीतले कि खरे स्वतत्र्य -2014 ला मिळाले. 1947 ला तर भिक मिळाली यामुळे देशाची व देशासाठी ज्या महापुरूषांनी देशासाठी बलीदान  दिले त्यांचा व  देशाचा अपमाण केला. त्यामुळे कंगणा राजावत यांच्या वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा व कठोर कार्यवाही करावी. असे निवेदन दिनाक १३ नव्हेबर शनिवार रोजी पोलीस ठाणे बदनापुर येथील पोलीस निरिक्षक शिवाजीराव बंटेवाड यांना तालुका कॉग्रेस कमेटी बदनापुरच्या वतीने देण्यात आले.

या निवेदनावर दिपक कांयदे,विधानसभा नेते सुभाष मगरे,शेख अन्वर अत्तार,लक्ष्मण म्हसलेकर,जयसिंग राजपुत,शेख युनुस हुसैन ,काजी सलीम हसनाबादकर,शेख इम्रान,रमेश शिंदे,शफीक पठाण,फिरोज पठाण,असिफ सय्यद,प्रमोद सांबळे,राजन मगरे,नईम शेख,शफी इनामदार आदीच्या स्वाक्षऱ्या आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने