महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नंदुरबार शाखेतर्फे दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात





महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नंदुरबार शाखेतर्फे दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात 


 म्हसावद ता.शहादा(प्रतिनिधी)

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा पोलीस प्रमुख श्री पी.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहर व जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव श्री  विशाल माळी, जिल्हाध्यक्ष श्री जगदीश सोनवणे व पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार दै नंददर्शनचे संपादक श्री सूर्यभान राजपूत, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक श्री रमाकांत पाटील, दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी श्री रमेश महाजन, संघाचे अध्यक्ष दैनिक खान्देश गौरवचे संपादक श्री हिरालाल चौधरी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण खेडकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र भावसार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र, साप्ताहिके, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री सूर्यभान राजपूत यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेचा इतिहास व वारसा याबाबत माहिती देताना 75 पेक्षा अधिक वर्षांचा जिल्ह्यातील पत्रकारितेचा वारसा असून, नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून एक आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक श्री रमाकांत पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पत्रकार संघाचा इतिहास सांगतानाच जिल्ह्यातील पत्रकारांनी राजकीय व प्रशासकीय दोन्ही बाजू सांभाळत उत्कृष्ट पत्रकारिता केल्याचे विधान केले. जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी श्री रमेश महाजन यांनी कोरोना काळात नंदुरबार जिल्ह्�

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने