*तापी नदीच्या पुलावर अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ .. हातांवर SM नावाचा टॅटू..कान तोडल्याने रक्तप्रवाह..ओळख पटविण्याचे पोलिसांना आवाहन.. अकस्मात मृत्यूची नोंद..*
शिंदखेडा दि.०५(प्रतिनिधी रवि शिरसाठ): तालुक्यातील सुकवद शिवारात तापी नदीच्या पुलावर तीस ते पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.महिलेचा खून का मृत्यू याबाबत काहीही माहिती हाती लागली नसून हातावर SM नावाचा टॅटू असून दोन्ही कानातील दागिने ओढून काढल्याने कानाचा भाग तोडल्याचा दिसतं असल्याने घटनेला लूटपाटचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, खबर देणार योगेश रामचंद्र पाटील पोलीस पाटील सुकवद ता. शिंदखेडा यांनी खबर दिली की, दिनांक ५/१०/२०२१ रोजी सुकवद शिवारातील तापी नदीच्या पुलावर एक अनोळखी स्त्री जातीचे वय अंदाजे ३२ ते ३५ वर्ष प्रेत पडले आहे सदर स्त्री चे प्रेतास खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे आणले असता तेथील डॉक्टर अपूर्वा साळुंखे यांनी सकाळी २०९/४५ वाजता तपासुन मयत घोषित केले बाबत खबर वरुन शिंदखेडा स्टेशनला अकस्मात मृत्यु रजि.६२/ २०२१ सीआरपीसी १७४मधील अ.मृ रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. सदर अनोळखी स्त्रीचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
मयताचे नांव : अनोळखी स्त्री वय ३२ ते ३५ वर्ष अंदाजे,
वर्णन :- रंग गोरा, उंची ५फुट २ इंच बांधा मजबुत केस काळे सोनेरी (डाय केलेले) अगात राखाडी कलरची फुलांची डिझाईन असलेली साडी व ब्लाऊज, उजव्या हाताचे मनगटावर इंग्रजी अक्षरात SM असे टेंटु गोंदलेले व चा टॅटू गोंदलेला. डाव्या हाताचे मनगटावर जुनी जख्म दिसत असुन हाताचे कोप-यावर खरचटलेले व रक्त निघालेले दिसत आहे तसेच डाव्या हाताचे कोंबीवर फुलपाखरुचे टॅदु व अंगठ्याजवळ इंग्रजीत M गोंदलेले आहे. मयताचे दोन्ही कानाचे किल्लुचा भाग फाटलेला व त्यातुन रक्त निघालेले दिसत असुन दोन्ही कानात पिवळ्या धातुचे हुजुर असुन नाकातून पांढरा द्रव निघत आहे.पुढील तपास श्री.निंबाळकर हे करीत आहेत.