बनावट फेसबुक अकाऊंट करून अरूणभाईं गुजराथी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न.. *राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलिसांत तक्रार
चोपडा दि.०५ (प्रतिनिधी)*मा.श्री.अरुणभाई गुजराथी साहेब* (माजी विधानसभाअध्यक्ष म.रा.) यांचे फेसबुक चे अकॉऊंट डुप्लिकेट बनवून त्यांना पैसे ची मागणी करून त्यांना बदनाम करण्याचे काम कोणती तरी व्यक्ती करीत आहे त्या बाबतीत महाशय पोलीस निरीक्षक चोपडा शहर पोलीस स्टेशन यांना तक्रार निवेदन दिले त्या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी मा.श्री.चंद्रहासभाई गुजराथी चेअरमन पिपल्स को-ऑप.बँक, शामसिंग परदेशी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,नौमान काजी माजी जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल, प्रफुल्ल स्वामी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आशिष गुजराथी सर,राजेश गुजराथी,मनोज पाटील तालुका युवक अध्यक्ष,समाधान माळी शहर युवक अध्यक्ष,पंचायत समिती सदस्य कल्पनाताई पाटील,मुक्तार सरदार,भुर्या भाई,नईमुद्दीन कुरेशी मोसिन शेख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष, जमील कुरेशी, नईम शेख, मयुर पाटील विद्यार्थी अध्यक्ष सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस व युवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते